Wednesday, 1 March 2017

दैनंदिनी - एक जपलेलं बालपण


 28 मे  2028 बाबा ची रूम आज साफ करत होतो आणि कपाटा वरून कसली तरी वही खाली पडली. बाबा ची डायरी होती , म्हणून कुतूहलाने वाचायला सुरु केली,
पाहिल्याच पानावर माझी जन्म तारीख बहुतेक माझ्या जन्मानंतर लिहायला लागले वाटतं
 आणि मी वाचायला सुरुवात केली ...


10 जानेवारी  1997

माझ्या सोनुल्यासाठी त्याच्या सर्व आठवणी जपून ठेवण्यासाठी ही डायरी लिहतोय ,

हॉस्पिटल बाहेर येरझाऱ्या घालत होतो. थोडा वेळ आधीच डॉक्टर येऊन सांगून गेले मुल आणि आई दोघांच्या जीवाला धोका आहे . आणि तुझ्या आईला ICU मध्ये नेलं. जीव कासावीस होत होता ICU चा दिवा विझला. जीवाला घोर लागला होता काय झालं असेल काय नाही तुझी आई कशी असेल माझं बाळ कसं असेल, काहीच सुचत नव्हतं, तितक्यात डॉक्टर बाहेर आले, "Congratulations मिस्टर अविनाश  तुम्हाला मुलगा झाला आणि बाळाची आई देखील सुखरूप आहे." डॉक्टरांचे हे शब्द कानावर पडले आणि जीवात जीव आला. 
मी बाप झालो. मला मुलगा झाला आज खूप खुश आहे मी , लगोलग जाऊन पेढे आणले हॉस्पिटल मध्ये सर्वांना  पेढे वाटले.
त्या दिवशी पहिल्यांदा तुला पहिलं, सफेद टॉवेल मध्ये गुंडाळलेला बाहुला वाटत होतास अगदी. माझीच द्रुष्ट लागते की काय माझ्या बाळाला असंच वाटत होतं .
 
15 जानेवारी  1997

पाच दिवसांनी  तुला आणि तूझ्या आईला घरी आणलं.
घर तुझ्या धुरीच्या वासाने दरवळून गेलं होतं. जिथे तिथे तुओले केलेले कपडे वळत होते, Dettol चा एक वेगळाच सुगंध  घरभर पसरलेला.

22 फेब्रुवारी  1997

आज माझ्या सोनूल्याचा बारसं. आत्या, आजी, आजोबा, काका,काकी ,मामा, मामी सर्व जमले होते तुझ्या बारशाला अगदी जोरदार झालं बारसं . "आदि" मोठ्या हौशीने ठेवलेलं तुझं नाव आम्ही. अविनाश आणि दीपालीचा "आदि" आमचा आदि .

10 जानेवारी  1998
आदिचा पहिला वाढ दिवस पण माझ्या बाळाला मागचे दोन दिवस खूप ताप होता  हैराण झालेलो आम्ही दोघेही.बाहेर कडाक्याची थंडी पडली होती आणि  तूझ्या आईच्या डोळयातून वाहणारे अश्रू काही थांबत नव्हते. रात्रभर तुझ्या उशाशी बसून डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत होती. रात्रभर झोपली नाही ती आणि मी सुद्धा .

26 जानेवारी  1999

तुझा पहिला नंबर आलेला आज "सुदृढ बालक" स्पर्धेमध्ये खूप खुश होती तुझी आई. तुला आवडतात म्हणून बेसनाचे लाडू केले होते तुझ्यासाठी.

10 जून  2013 

तुझा 12 वी चा निकाल लागला.  ९६% गुण मिळाले होते  तुला. आज मला खूप आनंद झाला top 10 मध्ये आलास तू .शाळेत तुझा सत्कार झाला, तुझ्या 12 वी च्या क्लासच्या फी साठी आईने खूप कष्ट केले. माझी रिक्षा ड्राइवरची नोकरी हातावरचं पोट,पण तुझ्यासाठी शिवणकाम शिकली त्यातून तुझ्या शिक्षणाची अर्धी जबाबदारी तिने उचलली. तू जे काही करू शकलास ते आईमुळे.

15 जुलै 2013 

तापाची साथ पसरली त्यात तू  आजरी पडलास मलेरिया झालेला तुला आणि  माझ्या कडे फारसे  पैसे नव्हते तुझा इलाज करायला.  माझी ऑटो एकमेव जगायचं साधन त्यावर आपली रोजी-रोटी होती, नातेवाईकांनी पाठ फिरवली, कुणाचा आधार नव्हता, तेव्हा रिक्षा गहाण टाकली मी. तुझ्या उपचारा साठी सर्व पैसा खर्च केला. रात्र रात्र भर जागून तुझ्या आईने खाण्याचे पदार्थ, मसाले केले, घरोघरी जाऊन ते विकले त्यातून आलेल्या पैशातून घर चालवले. मागचे 15-20 दिवस खूप कठीण गेले.

12 सप्टेंबर  2017

तुला नोकरी मध्ये बढती मिळाली Manager च्या पोस्टवर काम करायला लागलास. माझा मुलगा कंपनी मध्ये Manager आहे  सांगताना आनंद होतो मला .

20 सप्टेंबर  2021 

तुझं लग्न झालं. सुनबाईला तूच पसंत केलंस. एकुलता एक म्हणून तुझा हा हट्टपण पुरवला. सुखासुखी तुमचा संसार सुरु झाला.  आमचे आशिर्वाद सदा तुमच्या सोबत आहेत .

12 ऑक्टोबर  2022

दिपालीची तब्येत जरा नाजूक होती . हॉस्पिटल मध्ये admit केलं तिला,तू मात्र तिला पहायला आला नाहीस. तू तुझ्या मीटिंग्स,पार्टी मध्ये Busy होतास आणि जेव्हा आलास तेव्हा तुझी आई नव्हती . तिच्या जाण्याने पुरता खंगलो मी. वाटलं सर्व सोडून निघून जावं दूर कुठेतरी पण तुझा चेहरा आला समोर आणि हिम्मत नाही झाली जाण्याची कुठे . प्रचंड राग आहे, माझा तुझ्यावर.  तिला पाहायचं होत रे शेवटच्या क्षणीे पण तू आला नाहीस, बिचारी अशीच निघून गेली कायमची. तुला कधीच माफ करू शकणार नाही मी. खूप कष्ट केले आम्ही म्हणून तू या मीटिंगला जातोस फिरतोस पार्टी करतो.

15 मार्च  2023
 
ऐकलं मी तुला सुनबाईशी बोलताना , वृद्धाश्रमात नेणार आहात ना तुम्ही मला खुशाल न्या रे , अडचण वाटते या म्हाताऱ्या बापाची नेऊन सोड रे बाबा मला तिथे. पण आता जे घर माझं आहे , माझं आहे ; करत फिरतोस ना , ते घर मी घेतलं, रात-रात  रिक्षा चालवून मिळेल ते काम करून.  का ? तर माझ्या मुलाने कुठेतरी खितपत पडून राहू नये म्हणून . जाऊ दे माझं काय तुझं काय. मी अजून थोडे दिवस जगेन मग तुझंच आहे की सर्व आता दिला काय नंतर दिले काय . लवकर सोड रे बाबा मला कुठे सोडतोस तिथे तुझ्या सुखासाठी आजवर खूप केलं ,आयुष्य सरता सरता तुला दुःख नाही द्यायचं रे बाबा .
पुढे काही वाचणार त्या आधी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि गेलो "पहाट वृद्धाश्रम" मोठा बोर्ड होता 5 वर्षा आधी इथे बाबाला शेवटचा पाहिलं होत नंतर फिरकलो नाही फक्त पैसे पाठवत राहिलो कधी विचारपूस नाही केली कधी फोन नाही .पण आज आलोय बाबांशी बोलायला नाही, तर त्यांना त्याच्या  हक्काच्या घरी न्यायला.....

28 comments:

 1. True...very emotional and touching story... You need to write book..

  All the best for your new role and creative task...

  Regards
  Mohan Nawade
  Mohan.nawade@gmail.com

  ReplyDelete
 2. Ak no poo...😘 Mala pan training de ga thoda far.... 😅

  ReplyDelete
 3. Awesome pooja��..All the best

  ReplyDelete
 4. छान lihites !! manapasun

  ������������

  ReplyDelete
 5. I usually don't read such stuff...But hey tu pathavle hote mhnun vachle....n I must say that I can already feel tears in my eyes�� good thoughts good writing

  ReplyDelete
 6. Awesome Pooja...😉👍
  Heart touching story😇👏👐

  ReplyDelete
 7. Very touching story and the words which u have used are really good nice keep it up

  ReplyDelete
 8. Tujya kartutwala majha Salam ...
  Fakt ekach sangen ki asach kahitari ..Navin lihat Raha & amhala tumchyat samavun ghet Raha...Amhi amcha nashib samjhto ki tumchya sarke (friend) amhala labhle ...Thanks to u part of my life..All the best

  ReplyDelete
 9. Mast pooja Tu carry on kartes....mala nahi jamat ata lihayala....

  ReplyDelete
  Replies
  1. thodasa time kadh ani lihat ja tu kharch khup chan lihtos

   Delete