Sunday, 1 October 2017

आठवण

आठवण 

आज तुझी खूप आठवण येतेय.....
तू गेल्यानंतर पाहिल्यांदाच आज समुद्रावर गेले.
वर्ष झालं,तू मला सोडून गेलास 

आज समुद्र पहिला आणि पुन्हा तुझी आठवण आली..
याच वाळूत तासनं तास खेळात असायचो आपण,
 मी सोबत असले की तू हि लहान होऊन जायचास..
आणि याच किनाऱ्यावर माझा हात हातात घेऊन चालायचास...

 तुझ्या सोबत जूनचा पहिला पाऊस मी इथेच बसून पहिला होता 
आणि माझा हट्ट म्हणून तूही माझ्यासोबत भिजला होतास....

 आज समुद्रावर आले आणि सर्व काही आठवलं...
आजही सर्व तसेच आहे
          तोच समुद्र , तोच किनारा,
फरक एवढाच,तेव्हा तू असायचास सोबतीला ,
          आणि आज मी एकटी....
माझी किती काळजी असायची तुला
          म्हणून नेहमी माझ्या सोबत राहायचा..

 मग अचानक का रे सोडून गेलास मला एकटीला ?
Sunset झाला की घाई घाईने घरी घेऊन जायचास..
मी हट्ट केला की थंडीतही कुल्फी घेऊन द्यायचास..
आणि,"घरी आईला सांगू नकोस" बजावून सांगायचास.
आजही तसाच आहे हा समुद्र हा किनारा, सर्व काही 

फक्त तू नाहीस सोबतीला "बाबा"
असं मला एकटीला सोडून जाताना
काहीच कसं वाटलं नाही तुला ?

आज तुझी खूप आठवण येतेय..
"बाबा......" 

पहिलं प्रेम

शाळेच्या पहिल्या बाकावर ती बसायची ,
सर्व मुलींमध्ये तीच मला सुंदर दिसायची ,
जाता येता कधीतरी सोबत तिची असायची …
आणि मला पाहून उगीच  ती हसायची , ☺☻
दिसायला सावळी पण मनाने निर्मळ होती ,
मला कदाचित ओळखतही नसेल …. 
पण मनात माझ्या तीच होती ……. 
तिला पाहता यावं म्हणुन शेवटच्या बाकावर बसायचो ,
तिने मागे वळून पाहिलं तर मान खाली घालायचो ,
तिच्या सोबत बोलण्याची ओढ होती पण;
ती समोर आली कि मनाची पाटी कोरी व्हायची … 
कुणालाही भुरळ घालेल अशी तिची smile होती ,
reality मध्ये नसली तरी माझी dream queen तीच होती ☺ ☺
अशी ती माझी पहिली ' प्रेयसी ' होती .

Wednesday, 1 March 2017

दैनंदिनी - एक जपलेलं बालपण


 28 मे  2028 बाबा ची रूम आज साफ करत होतो आणि कपाटा वरून कसली तरी वही खाली पडली. बाबा ची डायरी होती , म्हणून कुतूहलाने वाचायला सुरु केली,
पाहिल्याच पानावर माझी जन्म तारीख बहुतेक माझ्या जन्मानंतर लिहायला लागले वाटतं
 आणि मी वाचायला सुरुवात केली ...


10 जानेवारी  1997

माझ्या सोनुल्यासाठी त्याच्या सर्व आठवणी जपून ठेवण्यासाठी ही डायरी लिहतोय ,

हॉस्पिटल बाहेर येरझाऱ्या घालत होतो. थोडा वेळ आधीच डॉक्टर येऊन सांगून गेले मुल आणि आई दोघांच्या जीवाला धोका आहे . आणि तुझ्या आईला ICU मध्ये नेलं. जीव कासावीस होत होता ICU चा दिवा विझला. जीवाला घोर लागला होता काय झालं असेल काय नाही तुझी आई कशी असेल माझं बाळ कसं असेल, काहीच सुचत नव्हतं, तितक्यात डॉक्टर बाहेर आले, "Congratulations मिस्टर अविनाश  तुम्हाला मुलगा झाला आणि बाळाची आई देखील सुखरूप आहे." डॉक्टरांचे हे शब्द कानावर पडले आणि जीवात जीव आला. 
मी बाप झालो. मला मुलगा झाला आज खूप खुश आहे मी , लगोलग जाऊन पेढे आणले हॉस्पिटल मध्ये सर्वांना  पेढे वाटले.
त्या दिवशी पहिल्यांदा तुला पहिलं, सफेद टॉवेल मध्ये गुंडाळलेला बाहुला वाटत होतास अगदी. माझीच द्रुष्ट लागते की काय माझ्या बाळाला असंच वाटत होतं .
 
15 जानेवारी  1997

पाच दिवसांनी  तुला आणि तूझ्या आईला घरी आणलं.
घर तुझ्या धुरीच्या वासाने दरवळून गेलं होतं. जिथे तिथे तुओले केलेले कपडे वळत होते, Dettol चा एक वेगळाच सुगंध  घरभर पसरलेला.

22 फेब्रुवारी  1997

आज माझ्या सोनूल्याचा बारसं. आत्या, आजी, आजोबा, काका,काकी ,मामा, मामी सर्व जमले होते तुझ्या बारशाला अगदी जोरदार झालं बारसं . "आदि" मोठ्या हौशीने ठेवलेलं तुझं नाव आम्ही. अविनाश आणि दीपालीचा "आदि" आमचा आदि .

10 जानेवारी  1998
आदिचा पहिला वाढ दिवस पण माझ्या बाळाला मागचे दोन दिवस खूप ताप होता  हैराण झालेलो आम्ही दोघेही.बाहेर कडाक्याची थंडी पडली होती आणि  तूझ्या आईच्या डोळयातून वाहणारे अश्रू काही थांबत नव्हते. रात्रभर तुझ्या उशाशी बसून डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत होती. रात्रभर झोपली नाही ती आणि मी सुद्धा .

26 जानेवारी  1999

तुझा पहिला नंबर आलेला आज "सुदृढ बालक" स्पर्धेमध्ये खूप खुश होती तुझी आई. तुला आवडतात म्हणून बेसनाचे लाडू केले होते तुझ्यासाठी.

10 जून  2013 

तुझा 12 वी चा निकाल लागला.  ९६% गुण मिळाले होते  तुला. आज मला खूप आनंद झाला top 10 मध्ये आलास तू .शाळेत तुझा सत्कार झाला, तुझ्या 12 वी च्या क्लासच्या फी साठी आईने खूप कष्ट केले. माझी रिक्षा ड्राइवरची नोकरी हातावरचं पोट,पण तुझ्यासाठी शिवणकाम शिकली त्यातून तुझ्या शिक्षणाची अर्धी जबाबदारी तिने उचलली. तू जे काही करू शकलास ते आईमुळे.

15 जुलै 2013 

तापाची साथ पसरली त्यात तू  आजरी पडलास मलेरिया झालेला तुला आणि  माझ्या कडे फारसे  पैसे नव्हते तुझा इलाज करायला.  माझी ऑटो एकमेव जगायचं साधन त्यावर आपली रोजी-रोटी होती, नातेवाईकांनी पाठ फिरवली, कुणाचा आधार नव्हता, तेव्हा रिक्षा गहाण टाकली मी. तुझ्या उपचारा साठी सर्व पैसा खर्च केला. रात्र रात्र भर जागून तुझ्या आईने खाण्याचे पदार्थ, मसाले केले, घरोघरी जाऊन ते विकले त्यातून आलेल्या पैशातून घर चालवले. मागचे 15-20 दिवस खूप कठीण गेले.

12 सप्टेंबर  2017

तुला नोकरी मध्ये बढती मिळाली Manager च्या पोस्टवर काम करायला लागलास. माझा मुलगा कंपनी मध्ये Manager आहे  सांगताना आनंद होतो मला .

20 सप्टेंबर  2021 

तुझं लग्न झालं. सुनबाईला तूच पसंत केलंस. एकुलता एक म्हणून तुझा हा हट्टपण पुरवला. सुखासुखी तुमचा संसार सुरु झाला.  आमचे आशिर्वाद सदा तुमच्या सोबत आहेत .

12 ऑक्टोबर  2022

दिपालीची तब्येत जरा नाजूक होती . हॉस्पिटल मध्ये admit केलं तिला,तू मात्र तिला पहायला आला नाहीस. तू तुझ्या मीटिंग्स,पार्टी मध्ये Busy होतास आणि जेव्हा आलास तेव्हा तुझी आई नव्हती . तिच्या जाण्याने पुरता खंगलो मी. वाटलं सर्व सोडून निघून जावं दूर कुठेतरी पण तुझा चेहरा आला समोर आणि हिम्मत नाही झाली जाण्याची कुठे . प्रचंड राग आहे, माझा तुझ्यावर.  तिला पाहायचं होत रे शेवटच्या क्षणीे पण तू आला नाहीस, बिचारी अशीच निघून गेली कायमची. तुला कधीच माफ करू शकणार नाही मी. खूप कष्ट केले आम्ही म्हणून तू या मीटिंगला जातोस फिरतोस पार्टी करतो.

15 मार्च  2023
 
ऐकलं मी तुला सुनबाईशी बोलताना , वृद्धाश्रमात नेणार आहात ना तुम्ही मला खुशाल न्या रे , अडचण वाटते या म्हाताऱ्या बापाची नेऊन सोड रे बाबा मला तिथे. पण आता जे घर माझं आहे , माझं आहे ; करत फिरतोस ना , ते घर मी घेतलं, रात-रात  रिक्षा चालवून मिळेल ते काम करून.  का ? तर माझ्या मुलाने कुठेतरी खितपत पडून राहू नये म्हणून . जाऊ दे माझं काय तुझं काय. मी अजून थोडे दिवस जगेन मग तुझंच आहे की सर्व आता दिला काय नंतर दिले काय . लवकर सोड रे बाबा मला कुठे सोडतोस तिथे तुझ्या सुखासाठी आजवर खूप केलं ,आयुष्य सरता सरता तुला दुःख नाही द्यायचं रे बाबा .
पुढे काही वाचणार त्या आधी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि गेलो "पहाट वृद्धाश्रम" मोठा बोर्ड होता 5 वर्षा आधी इथे बाबाला शेवटचा पाहिलं होत नंतर फिरकलो नाही फक्त पैसे पाठवत राहिलो कधी विचारपूस नाही केली कधी फोन नाही .पण आज आलोय बाबांशी बोलायला नाही, तर त्यांना त्याच्या  हक्काच्या घरी न्यायला.....

Sunday, 25 September 2016

पाऊस

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
शाळेत जाणारी मुलं पाहीली आणि वाटलं ,
पाऊस म्हणजे शाळेची सुरवात नवी पुस्तकं,नवं दप्तर,
 नवे कपडे आणि नवीन दोस्त....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
टपरीवर चहा पिताना वाटले ,
छे!! पाऊस म्हणजे तर टपरीवरची कटिंग ,
एक प्लेट भजी आणि कट्ट्यावरचे मित्र ....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
घरातून बाहेर पडले तेव्हा वाटलं,
अरे पाऊस म्हणजे लेट झालेल्या ट्रेन,
नाक्यावरचं ट्रॅफिक आणि छत्र्यांची गर्दी....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
समुद्र किनारी फिरताना वाटलं ,
पाऊस म्हणजे प्रेमाची सुरवात....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
शेतात राबणाऱ्या आईला पाहून वाटलं ....
पाऊस म्हणजे हाच मातीचा गंध ,
आणि बीजाला फुटणारा अंकुर,
पण जेव्हा बाबाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला तेव्हा वाटलं
अरे पाऊस म्हणजे बळीराजाचे अश्रू पाहून
त्या मेघराजाला फुटलेला पाझर ....

Saturday, 2 July 2016

क्षितीज - संवाद माझा माझ्याशी

संध्याकाळी समुद्रकिनारी सहजच फिरायला आलो. समोर विविध रंगांनी आभाळ रंगून गेलं होत दूरवर जमीन आणि पाणी एकत्र आल्याच पाहिलं आणि बालपणाच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या "वो बचपन के भी क्या दिन थे ।". 

   लहानपणी जायचो फिरायला दूर बाबा सोबत, कधी समुद्र किनारी,भाजीमंडईमध्ये  तर कधी सहज वाट नेईल तिथे.  मोकळा रस्ता समोर निरभ्र आकाश मजा यायची फिरायला. आणि लहानपणी उत्सुकता असायची ती एकाच गोष्टीची क्षितिजाची. जिथे आकाश आणि भूमी एक होतात  तो भाग म्हणजे "क्षितिज"
आणि बाबा चा हाथ सोडून त्या क्षितिजा मागे धावत जायचो  आणि आईची आठवण यायची अर्थातच इतकं सुसाट धावल्यावर पडणारच ना मग आपसूक तोंडून आई गssss शब्द यायचे आणि थांबायचो।

बाबा नेहमी सांगायचा "अरे, या क्षितिजा मागे धावून नको हो, दिसायला फार सुंदर दिसतं हे आकर्षक, मनमोहक पण लांबूनच.  जितकं जवळ जाशील हे तितकंच लांब जातं.  बघ ना  याच्या मागे धावत धावत किती लांब आलास तू. "
हो खरंच,किती  लांब गेलो होतो मी तेव्हा त्या क्षितिजामागे धावता धावता बाबा मागे आहे हयाचं सुद्धा भान नव्हत मला.

    बघ हो,क्षितिजा मागे धावता धावता मलापण विसरलास,म्हणाला  होता  बाबा.  आणि  मी वळून sorry म्हणालो होतो  तेव्हा , आजही आठवतंय....

    बाबाने तेव्हा किती कमी शब्दात जीवनाचं सार समजावलं होतं.. बस तेव्हा बालबुद्धिला समजलं नव्हतं पण आज सर्व समजत आहे.

    शिक्षणासाठी मुंबईला आलो आणि नंतर इथेच स्थाईत झालो आई बाबा गावीच राहिले. माझं घर घेतल्यावर बोलवलं ही त्यांना एकदा दोनदा  पण ते तिथेच खुश आहेत वाटतं. घर कसलं ते नुसता flat घर तर ते जिथे सर्व गुण्यागोविंदाने राहतात माझे सर्व तर गावाकडेच राहिले . कधीकधी वाटायंच,"राग आला असेल का ?माझा त्यांना. " इतके वर्ष मी साधी विचारपूसही केली नव्हती.  फक्त दर महिना मनीऑर्डर पुरती तार यायची त्यांची तितकाच काय तो संबंध कधी गावी गेलो नाही.सुरवातीला आई फोन करायची पण मला वेळ नसायचा कॉलेज क्लास यातच वेळ जायचा सर्व, मग कंटाळा यायचा आणि बोलायचं राहूनचं जायचं  कॉल बॅक नाहीच केला कधी.

    नंतर नंतर मी माझं  करीयर करण्यात गुंतून गेलो.आणि हळू हळू आईचे फोन पण यायचे कमी झाले आणि शेवटी बंदच. मात्र तार अजूनही सुरूच होती फरक इतकाच कि आधी गावाकडून मनीऑर्डर यायची आणि आता मी दर महिना पैसे पाठवायचो.  आणि आता तर आई बाबाच राहिले नाही मग गावाकडे जायचा प्रश्नच उरला नाही आणि मनीऑर्डर पण बंद .

    आज मी माझं क्षितिज गाठलं माझी सर्व स्वप्न पूर्ण केली  त्या क्षितिजाचा पाठलाग केला .. आज मी सर्जन  आहे.माझं स्वतःच हॉस्पिटल आहे. गरजू लोकांसाठी एक क्लिनिक काढलं आहे. आज सर्व काही आहे माझ्याकडे, पण आई बाबा नाही सोबतीला, नाही जास्त मित्र; संपत्ती खूप कमावली पण आपली माणसं मात्र हरवली. बाबा बरोबर बोलायचा आज समजतंय मला.

    मी वेडा क्षितिजा चा पाठलाग करत राहिलो आणि गाठलं माझं "क्षितिज"  पण  या क्षितिजाचा पाठलाग करता करता खरंच आपली माणसं कधी मागे राहून गेली समजलंही नाही आणि समजलं तेव्हा उशीर झालेला आहे.


Monday, 6 June 2016

माणुसकी

सहज पार्क मध्ये चालत होते पार्क तसा शांतच होता वर्दळ होती ती म्हाताऱ्या माणसांची आणि लहान मुलांची , तशी भेळ वाल्याचीही  रेलचेल होतीच पार्क म्हटल कि आलंचं सर्व ,
पण माझं लक्ष वेधून घेतलं ते त्या ब्राह्मण गृहस्थानी तिशी पार केली असेल,शिकलेले दिसत होते. गळयात माळ कपाळावर चंदन लावलेलं.आपल्या लहान भावाला काहीतरी सांगत होते हिंदू मुस्लिम जाती बद्दल. मी काहीशी दूरच होती पण अस्पष्ट असं बोलणं पडत होत माझ्या कानावर ...
मलाही थोडं कुतूहल वाटलं तशी मलाही हौस, जाती धर्मा बद्दल जाणून  घायची म्हणून त्याच्या शेजारच्या बाकावर जाऊन बसले आता त्यांचा संवाद स्पष्ट ऐकू येत होता ,
गृहस्थ:" तुझा तो मित्र आहे ना रे अली त्याच्या पासून थोडा लांबच राहा"
मुलगा:"का रे दादा काय झालं .खूप चांगला मुलगा आहे तो हुशारसुद्धा सलग तीन वर्ष शाळेत पहिला येतो तो शिवाय sports मध्ये पण अव्वल"
गृहस्थ : "ते काहीही असो तुला सांगितलं ना दूर राहायचं"
मुलगा: "अरे पण का ??"
गृहस्थ : "अरे तू ब्राह्मण आहेस आणि तो मुस्लिम .मांस मटन खाणारे ते त्यांच्या पासून दूरच राहा तुलाही बाटवतील आणि लक्षात ठेव तू ब्राह्मण आहेस तुला असं वागणं शोभत नाही ."
मुलगा:"दादा, पण तो खरचं खूप चांगला मुलगा आहे"
मला थोडी चीड येत होती त्या माणसाची या technology च्या काळात देखील असे काही लोक आहेत हे पाहून थोडं वाईटही वाटलं पण त्या मुलाचा विरोध पाहून काहीस मन शांत झालं तितकंचं समाधान उद्याची पिढी तरी जाती भेदाला विरोध करतेय पाहून आनंद वाटला.
तितक्यातच त्या  गृहस्थाना ठसका लागला माझ्या हातात पाण्याची बाटली होतीच मी लागलीच ती पाण्याची बाटली त्यांच्या हातात दिली .
ते ही निसंकोच पाणी प्यायले .
आणि मला त्यांनी माझं नाव विचारलं ,माझं नाव मी सांगितलं "शबाना"
तसा रंगच उडाला त्यांच्या चेहऱ्याचा इतका वेळ जाती बद्दल बोलत असणारे ते गरजेच्या वेळी एका मुस्लिम मुलीने दिलेले पाणी प्यायले कदाचित धर्म भ्रष्ट झाला त्यांचा.  असंच वाटलं असेल त्यांना पण ,त्यांच्या नजरेत अपराधीपणाची भावना दिसली मला.
मीच म्हणाले ,काका , माझा धर्म "माणुसकी" मी माझ्या धर्मच पालन केलं आणि तुम्हाला पाणी देऊन मी तुमचा धर्म बुडवला असेल तर माफ करा  . तो मुलगा मात्र आमच्याकडे पाहत होता त्याच्या मनात काय चाललेलं त्यालाच ठाऊक!

Wednesday, 20 April 2016

It's you

My first thought of the day ..
When I was depressed it's you who encouraged me ...
Yaa its you with whom I like to  share  everything ..
It's you who always love me...
Very important Person in my life is "YOU"..
Who always be with me...
You are the one who cares for me  all the time ...
More than my friend...more than my sister.. It's you my dear mother

Happy mother's day